संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

कोल्हापूर-हैदराबाद विमानसेवा आता बंद होण्याच्या मार्गावर

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

कोल्हापूर – चार वर्षांपूर्वी सुरू झालेली कोल्हापूर-हैदराबाद मार्गावरील ‘अलायन्स एअर’ची विमानसेवा आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. याबाबत कंपनीने कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिले नसले,तरी ३० ऑक्टोबरपासून या कंपनीच्या विमानसेवेची ऑनलाईन तिकीट विक्री बंद केली आहे.

‘उडान’ योजनेत कोल्हापूरचा समावेश झाल्यानंतर ‘अलायन्स’ने पहिली सेवा सुरू केली.हैदराबाद- कोल्हापूर,कोल्हापूर-बंगळूर, बंगळूर-कोल्हापूर आणि कोल्हापूर-हैदराबाद अशी ही विमानसेवा ९ डिसेंबर २०१८ रोजी सुरू झाली होती. कोल्हापूरला चांगली संधी असल्याने या कंपनीने मुंबई, गोवा मार्गांसाठीही चाचपणी सुरू केली होती.दरम्यान, ३० मार्च २०२२ पासून कंपनीची कोल्हापूर-बंगळूर ही सर्वाधिक फायद्यात सुरू असलेली सेवा बंद झाली. हैदराबाद मार्गावर सकाळी सेवा उपलब्ध झाल्याने हैदराबादहून अन्य ठिकाणी जाणार्‍या प्रवाशांसाठी हे विमान उपयुक्त ठरत होते. त्याला चांगला प्रतिसादही होता.आता ही सेवाही बंद होण्याच्या मार्गावर आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami