संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 24 March 2023

कोस्टल रोडला लतादीदींचे नाव
द्या, मंगेशकर कुटुंबीयांची मागणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई: -लता मंगेशकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईतील हाजी अली चौकात लतादीदींच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. स्मारकाच्या भूमिपूजन प्रसंगी उषा मंगेशकर म्हणाल्या की, ‘लता दीदींच्या स्मारकाचे भूमिपूजन झाले, याचा खूप आनंद होत आहे. मुंबईत बांधल्या जाणाऱ्या कोस्टल रोडला लतादीदींचे नाव देण्यात यावे, अशी विनंती आम्ही राज्य सरकारकडे करतो.’
उषा मंगेशकर म्हणाल्या की, ‘महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा मोठा प्रकल्प होतोय आणि तो आमच्या घराजवळच बनत आहे. त्यामुळे याला दीदींच नाव द्यावे अशी आमची इच्छा आहे. लोढा हे या प्रकल्पाच्या कामात सक्रिय आहेत. महानगर पालिकाही आमच्या सोबत आहे. त्यामुळे या प्रकल्पाला लती दिदींचे नाव देण्यात यावे, असे आम्हाला वाटते आणि ते होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे’.
लता मंगेशकर यांचे भव्य स्मारक मुंबई बीएमसीकडून मुंबईमधील ताडदेव येथील हाजीअली चौक येथे बांधले जाणार आहे. या स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज संपन्न झाला. या कार्यक्रमाला कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर, नेफू आदिनाथ मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबातील इतर सदस्यांनी हजेरी लावली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या