संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 09 December 2022

कोहिनूर हिरा भारतात परत आणण्यासाठी राष्ट्रपतींना पत्र

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुरी : राणी एलिझाबेथ दुसरी यांच्या निधनानंतर भारताने त्यांच्या मुकुटावर सजवलेल्या कोहिनूर हिऱ्यावर पुन्हा एकदा दावा केला जात आहे.ओडिशाच्या एका सामाजिक-सांस्कृतिक संस्थेने दावा केला आहे की कोहिनूर हिरा भगवान जगन्नाथ यांचा आहे. त्यामुळे युनायटेड किंगडममधून भारतातील ऐतिहासिक जगन्नाथ पुरी मंदिरात परत आणावा यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हस्तक्षेप करावा अशी पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे.

श्री जगन्नाथ मंदिर संघटनेने राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू एक पत्र पाठवले आहे. ज्यामध्ये 12 व्या शतकातील मंदिरामधील कोहिनूर हिऱ्याला परत भारतात आणण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे. संघटनेच्या मते, कोहिनूर हिरा श्रीजगन्नाथ भगवानांचा आहे आणि तो पुन्हा भारतात आणण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे कोहिनूर हिरा भारतामध्ये आणण्यासाठी पाऊल उचलण्याचे आश्वासन द्यावे. ज्यामुळे ब्रिटन प्रसिद्ध जगन्नाथ पुरी मंदिराला कोहिनूर परत देईल. दरम्यान, महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा प्रिंस चार्ल्स आता राजा झाला आहे आणि नियमानुसार 105 कॅरेटचा हिरा त्यांच्या पत्नीकडे डचेस ऑफ कार्नवाल कॅमिलाकडे जाईल, जी आता नव्या राजाची पत्नी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराजा रणजीत सिंह यांनी कोहिनूर हिरा आपल्या इच्छेने श्रीजगन्नाथ यांना दान केला होता. त्या काळी महाराजा रणजीत सिंहने अफगाणिस्तानचा नादिर शाह विरोधात लढाई जिंकल्यानंतर हा हिरा जगन्नाथ मंदिरात दान केला होता.इतिहासकार आणि शोधकर्त्यांच्या मते, 1839 मध्ये रणजीत सिंहचा मृत्यू झाला होता आणि 10 वर्षांनंतर इंग्रजांनी कोहिनूरला त्यांचा मुलगा दलीप सिंहकडून हिसकावून घेतला. त्यामुळे कोहिनुर हिरा भारतात परत आणण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami