संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

क्रिप्टोकरन्सीवर कर आकारला तरी हे चलन वैध नाही; केंद्रीय मंत्र्यांचा खुलासा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – क्रिप्टोकरन्सीतून मिळणाऱ्या नफ्यावर कर लावला याचा अर्थ ती अधिकृत केली असा होत नाही. क्रिप्टोकरन्सी अधिकृत करायची की, त्यावर बंदी घालायची का याचा निर्णय सरकार घेणार आहे. त्याचा आत्ताच अंदाज लावता येत नाही, असे केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज येथे स्पष्ट केले.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२२-२३ चे बजेट मांडताना क्रिप्टोकरन्सीच्या नफ्यावर ३० टक्के कर आकारण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी भारतात अधिकृत केली जाईल, अशी चर्चा सुरू झाली होती. त्यावर स्पष्टीकरण देताना अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, मी सध्या क्रिप्टोकरन्सी कायदेशीर किंवा अधिकृत करत नाही. त्यावर बंदी घालायची किंवा नाही याचा निर्णय नंतर होणार आहे. क्रिप्टोकरन्सीबाबत संपूर्ण माहिती घेतल्यानंतर त्यावर निर्णय होणार आहे. सध्या क्रिप्टोकरन्सीवर कर लावला आहे. यामुळे ती अधिकृत होत नाही, असे त्यांनी सांगितले.

क्रिप्टोकरन्सीला मान्यता देण्यास आरबीआयचा विरोध आहे. देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे आरबीआयचे मत आहे. शिवाय अर्थव्यवस्था आणि आर्थिक स्थैर्यालाही धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीबाबत आगामी हिवाळी अधिवेशनात निर्णय होण्याची शक्यता आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami