नवी दिल्ली – क्रिप्टोकरन्सी बाजारात शुक्रवारी चांगली वाढ झाली. बिटकॉईनसह सर्व करन्सी ग्रीन मार्कमध्ये ट्रेड करत आहेत. कालच्या तुलनेत क्रिप्टो बाजारात १०.७८ टक्क्यांनी वाढ झाली तर क्रिप्टो मार्केट कॅप १.७२ डॉलर ट्रिलिअनवर पोहोचला. तसेच, मार्केट व्हॉल्यूममध्ये $130.88 बिलियनवर 29.74 टक्क्यांनी मोठी झेप घेतली आहे.
बिटकॉईनने सकाळी ११.४० मिनिटांपर्यंत १०.५७ टक्के वाढ झाली. सध्या बिटकॉइनचा दर $38,461.71 असून मार्केट कॅप $730,411,425,764 वर गेली आहे. इथेरियमचीही किंमत ११.३३ टक्क्यांनी वाढली असून $2,615.16 वर ट्रेड करत आहे. तर, . डॉजकॉइनची किंमत देखील 9.19 टक्क्यांनी वाढली आहे आणि आता $0.1225 वर ट्रेड करत आहे. डॉजकॉइनची मार्केट कॅप $16,253,781,699 आहे.
प्रमुख करन्सीमध्ये वाढ झाली असली तरी टिथरमध्ये घसरण झाली आहे. टिथर गेल्या २४ तासांत ०.०१ टक्क्यांनी खाली आले असून ते $1.00 वर ट्रेड करत आहे. याची मार्केट कॅप $79,515,518,620 वर चालू आहे. तर, दुसरीकडे . BNB चे दर मात्र वाढले आहेत. गेल्या २४ तासांत बीएनबीच्या दरात ७.८६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर सध्या याची किंमत $361.71 आहे.