Fake News! राष्ट्रीय कुस्तीपटू निशा दहियाच्या हत्येची माहिती खोटी

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

नवी दिल्ली – हरयाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील हलालपूर गावात गोळीबार झाल्याचे वृत्त समोर आले होते. राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू निशा दहिया आणि तिच्या भावाची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली, अशा बातम्या आल्या. मात्र हे वृत्त चुकीचे आहे. निशाची प्रकृती उत्तम असून तिनेच एका व्हिडिओद्वारे ही माहिती दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ समोर आणला आहे. वृत्तानुसार, निशा गोंडा येथे वरिष्ठ कुस्ती स्पर्धा खेळण्यासाठी गेली आहे.

हलालपूर येथील सुशील कुमार कुस्ती अकादमीत निशा दहिया आणि तिच्या भावाची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली, असे वृत्त समोर आले होते. या घटनेत निशा आणि तिचा भाऊ सूरजचा जागीच मृत्यू झाला आणि त्यांची आई धनपती यांची प्रकृती गंभीर असून तिला रोहतक पीजीआयमध्ये पाठवण्यात आले असल्याचे खोटे वृत्त समोर आले होते. मात्र मी ठीक असून मला काहीही झालेले नाही, असे निशाने सांगितले.

Close Bitnami banner
Bitnami