संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 19 January 2022

क्रेडिट कार्ड बंद करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

सध्या सहज क्रेडिट कार्डचा वापर केला जातो. दैनंदिन व्यवहारासाठी हे कार्ड उपयुक्त असल्याने याचा वापर वाढला आहे. मात्र कधी कधी आपण या कर्डवरून अनावश्यक खर्च करतो आणि मोठं कर्ज तयार होतं. त्यामुळे मग आपण क्रेडिट कार्ड बंद करण्याचा निर्णय घेतो. मात्र असा निर्णय घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

थकबाकी ठेवू नका

क्रेडिट कार्ड बंद करताना थकबाकी भरायला विसरू नका. थकबाकी असल्याशिवाय कोणतेच क्रेडिट कार्ड बंद करता येत नाही. त्यामुळे थकबाकी भरण्याकडे लक्ष असूद्या.

क्रेडीट युटिलायझेशन रेश्यो (CUR)
CUR म्हणजे उपलब्ध क्रेडीट कार्डवरील मर्यादा आहे जी तुम्ही खर्च करताय. हा रेश्यो वाढत जातो. जर तुम्ही तुमचे हप्ते वेळच्या वेळी भारत असाल तर तुम्हाला ही मर्यादा वाढून मिळते.

रिवॉर्ड पाईंट्सचा लाभ
बहुतांश क्रेडीट कार्ड कंपन्या कार्डावरून केलेल्या व्यवहारासाठी रिवॉर्ड पॉईंट्स देतात. क्रेडीट कार्ड अकाऊंट बंद करण्यापूर्वी रिवॉर्ड पॉईंट्स प्राप्त करायला विसरू नका. बँकेच्या मार्केटिंग भागिदाऱ्यांसोबत हे रिवॉर्ड्स कॅशबॅक डिस्काऊंट, कुपन आदी सेवांसाठी वापरले जाऊ शकतात.

फॉलोअप

क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी तुम्हाला वेळेवर अर्ज करावा लागेल. त्यानंतर बँकेकडून नो ड्यूज सर्टिफिकेटही घ्यावं लागेल. यासाठी बँकेत सतत फॉलो अप घेणे गरजेचे आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami