संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

खगोलप्रेमिंसाठी पर्वणी! लडाखमध्ये साकारतेय “नाईट स्काय अभायारण्य’

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – लडाखच्या हेन्ली येथील थंड वाळवंटात देशातील पहिले “नाईट स्काय अभयारण्य’ साकारण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली. लडाखच्या हेन्लीत डार्क स्काय रिझर्व्ह उभारण्यात येणार आहे. ते ऑप्टिकल, इन्फ्रा-रेड आणि गामा-रे दुर्बिणीसाठी जगातील सर्वोच्च ठिकाणांपैकी एक आहे. खगोल प्रेमींसाठी ही पर्वणी आहे.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि लडाखचे राज्यपाल आर. के. माथुर यांची बैठक झाली. त्यात लडाखमध्ये डार्क स्काय रिझर्व्ह, साईड विज्ञान आणि तंत्रज्ञानाद्वारे स्थानिक पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार केंद्रशासित प्रदेश प्रशासन, लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल लेह आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एस्ट्रोफिजिक्स यांनी डार्क स्काय रिझर्व्ह सुरू करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. नाईट स्काय अभयारण्यासाठी हेन्ली सर्वोत्तम ठिकाण आहे. तेथे मानवी वस्ती नाही. थंड वाळवंटात चांदण्याच्या प्रकाशात सुंदर आकाशाचे निरीक्षण करता येईल. त्यासाठी यातील सर्व संस्था एकत्रित काम करतील. लडाखच्या हेन्ली वाळवंटात वर्षभर आकाश निरभ्र आणि कोरडे हवामान असते. या प्रकल्पामुळे खुल्या आकाशात चांदण्या पाहण्याचा आनंद खगोल प्रेमींना घेता येईल.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami