संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

खालापूरजवळ कारचा भीषण अपघात
वाईतील दोघांचा मृत्यू, १० जण जखमी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी मुंबई- सातारा जिल्ह्यातून कोपरखैरणे येथे निघालेल्या इको कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील खालापूरच्या माडप बोगद्याजवळ घडली.या इको कारमधील एक महिला आणि एक पुरुष असे दोघेजण जागीच ठार झाले तर गंभीर जखमी झालेल्या दहा जणांना एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. या भीषण अपघातातील दोघा मृतांची नावे – लक्ष्मी विठ्ठल कोंढाळकर (२४) आणि गणेश बाळू कोंढाळकर,(२२)अशी असून ते वाई तालुक्यातील कोंढावळे गावचेच रहिवाशी होते.सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातल्या कोंढावळे येथून कोपरखैरणे नवी मुंबई येथे मारुती इको कारने ड्रायव्हरसह काहीजण निघाले होते.त्यावेळी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबईच्या दिशेने माडप बोगद्याजवळ ही कार आली असता स्त्याच्या कडेला पंक्चर झालेला टायर बदलण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकवर मागून धडकली.ही धडक एवढी गंभीर होती की, इको कार मधील सर्वच प्रवाशांना मोठी दुखापत झाली.सर्व जखमींना जखमी प्रवाशांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे. त्यातील सहा ते सात जणांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या आहेत.त्यांची प्रकृती नाजूक आहे.रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक कोळंबली होती. इको कार मधील जखमींना बाहेर काढण्यासाठी आयआरबी पेट्रोलिंग आणि देवदूत यंत्रणेला मोठी शिकस्त करावी लागली.इको कारचा चालक अंकुश राजाराम जंगम (३२) हा सुद्धा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे.क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कारमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. पुढील तपास खालापूर तालुका पोलीस करत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami