खासदार भावना गवळींचा निकटवर्तीय सईद खानची मालमत्ता जप्त, ईडीची मोठी कारवाई!

Share on facebook
Facebook
Share on twitter
Twitter
Share on whatsapp
WhatsApp
Share on telegram
Telegram
Share on email
Email
Share on print
Print

मुंबई – शिवसेना खासदार भावना गवळी यांची सध्या ईडीकडून बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी चौकशी सुरू आहे. २७ सप्टेंबरला ईडीनं भावना गवळी यांना समन्स बजावलं होतं. त्यांचे निकटवर्तीय सईद खान यांना देखील ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. ईडीने सईद खान यांची मालमत्ता जप्त केली आहे. 

३० ऑगस्ट रोजी वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड आणि आसपासच्या ठिकाणी भावना गवळींशी संबंधित संस्थांमध्ये झडती घेण्यात आली होती. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी भावना गवळी यांच्यावर १०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. त्यासंदर्भात ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. भावना गवळी वाशिम-यवतमाळच्या शिवसेना खासदार असून त्यांना याआधी २७ सप्टेंबरला समन्स बजावून ४ ऑक्टोबरला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.

महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्ये झालेल्या कथित घोटाळ्यासंदर्भात ही चौकशी सुरू आहे. दरम्यान, इडीने महिला उत्कर्ष प्रतिष्ठान (सेक्शन ८ कंपनी) कडून बेकायदेशीरपणे निधी पळवून नेल्यासंदर्भात सईद खान यांची ३.७५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे, एनआय या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे. 

Close Bitnami banner
Bitnami