संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 05 October 2022

खासदार संजय राऊतांच्या जामीन अर्जावर 27 सप्टेंबरला सुनावणी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर 27 सप्टेंबरला सुनावणीला सुरु होणार आहे.त्यांचे मित्र प्रवीण राऊत यांच्या जामिनावरील सुनावणी शुक्रवारपर्यंत पूर्ण होणार आहे. आज संजय राऊतांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी होणार होती. मात्र वाहतूक कोंडीमुळे संजय राऊतांना आर्थर रोड जेलहून कोर्टात पोहचण्यास तब्बल दीड तास उशिर झाला. ते कोर्टात येण्यापूर्वीच संजय राऊतांच्या जामीन अर्जावर 27 सप्टेंबरला सुनावणी घेण्याचे कोर्टाकडून निश्चित करण्यात आले होते. कोर्टाने राऊतांना सुनावणीला हजर होण्यासाठी लागलेल्या विलंबाचीही नोंद घेतली. दरम्यान, 19 सप्टेंबर रोजी संजय राऊतांच्या जामीन अर्जावर आणि कोठडीबाबत एकत्रित सुनावणी पार पडली होती.यावेळी कोर्टाकडून संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी 14 दिवसांनी वाढली. याप्रकरणी ईडीने काही दिवसांपूर्वीच संजय राऊत यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. 1039 कोटी रुपयांच्या या गैरव्यवहारात राऊतांचा थेट सहभाग असल्याचा दावा या आरोपपत्रातून ईडीने केला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami