औरंगाबाद – औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर कव्वालीच्या कार्यक्रमात पुन्हा चक्क नोटांचा पाऊस पाडण्यात आला आहे.औरंगाबाद शहरातील आमखास मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या कव्वालीच्या कार्यक्रमात जलील यांच्यावर अक्षरशः नोटांचा पाऊस पडत होता.
जलील यांच्यावर पैसे उधळण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. विशेष म्हणजे जलील यांच्यावर नोटा उधळण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील खुलताबाद येथे एका कव्वालीच्या कार्यक्रमात आणि एका लग्नसमारंभात एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी जलील यांच्यावर नोटा उधळल्या होत्या.