संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

खेडजवळ डोंगराला सुरुंग लावताना दरड कोसळली; मुंबई-गोवा महामार्ग ठप्प!

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

रत्नागिरी – खेडजवळील भोस्ते घाटात सुरुंग लावण्यात आला होता. त्यामुळे दरड कोसळली असल्यानं त्याचा फटका वाहतुकीला बसला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक खेडजवळ ठप्प झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सध्या ही वाहतूक पूर्ववत करण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत.

मुंबई-गोवा या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. यातच खेड जवळील भोस्ते घाटात सध्या रुंदीकरणाचे काम वेग घेत असताना दुपारच्या वेळेस या घाटात असणारा डोंगर फोडण्यासाठी सुरुंग लावण्यात आला. या सुरुंगामुळे डोंगर फुटून त्याची माती ते रस्त्यावर आली. त्यामुळेच हा महामार्ग ठप्प झालाय. सध्या या रस्त्यावर मातीचा ढिगारा आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम कल्याण टोल वेज कंपनी करत आहे. दरम्यान, सध्या या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. मातीचा ढिगारा दरड कोसळून मुख्य रस्त्यावर आल्यानं या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान, वाहतूक पूर्ववत करण्यासाठी आता युद्धपातळीवर काम सुरु करण्यात आलं आहे. मात्र अनेक प्रवाशांना वाहतूक ठप्प झाल्यानं फटका बसला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami