संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

खोटे गुन्हे रद्द करा! अकोला उच्च न्यायालयाची फिर्यादीसह पोलिसांना तंबी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अकोला – केवळ त्रास देण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केले जात असतील तर ते गुन्हे रद्द करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने स्थानिक पोलिसांना दिले असल्याचे समोर आले आहे. अर्थात खोटी फिर्याद देऊन त्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या फिर्यादीला आणि अकोला पोलिसांना तंबी देत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने खोटे गुन्हे रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. माहितीनुसार, या आदेशाने पोलीस प्रशासनात खळबळ माजली आहे.

अकोला येथील होलसेल किराणा मार्केटमध्ये कृष्णा तेल भंडार नावाचे प्रतिष्ठान आहे. या प्रतिष्ठानाचे संचालक मुकेश बगडिया यांनी तेथील दोन कामगारांसह फिर्यादी अमोल महादेव वानखडे याला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार ९ मे २०२१ रोजी जुने शहर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली होती. फिर्यादीच्या तक्रारीवरून जुने शहर पोलिसांनी आरोपी मुकेश बगडिया, शेख शाहद शेख मन्सूर, शेख अरबाज शेख मन्सूर या तिघांविरुद्ध भां.द.वी.कलम ३२३, ३२४,५०४,३४ तसेच जातीवाचक प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर आरोपींना जुने शहर पोलिसांनी त्रास देण्याचे काम केले. या सर्व प्रकाराविरोधात आरोपी मुकेश बगडिया यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे दार ठोठावले. त्यांचे विधिज्ञ सुमित महेश बजाज यांनी सदर याचिकेचा पाठपुरावा करीत न्यायालयात युक्तिवाद केला. युक्तीवाद करताना तक्रारकर्ता आणि पोलिसांनी संगनमत करून त्रास देण्यासाठी सदर गुन्हे दाखल केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. एड. सुमीत महेश बजाज यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश ए.एस.चांदुरकर व न्यायाधीश जी.ए.सानप यांनी अकोला पोलिसांना सरळ एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले. या आदेशामुळे पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami