संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 02 February 2023

खोत-पडळकरांच्या एसटी कर्मचारी संघाचा हिवाळी अधिवेशनात उपोषणाचा इशारा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नागपूर- महाविकास आघाडी सरकार असताना एसटी कर्मचारी आंदोलनात सहभागी असलेल्या आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी शिंदे सरकारला घरचा आहेर दिला आहे.सध्या मागील प्रदीर्घ संपातून सावरलेली एसटी पूर्ववत सुरू असताना आता एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्य मागण्यांची अंमलबजावणी न झाल्याने गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने मुख्यमंत्र्यांना हिवाळी अधिवेशनात आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.यासंदर्भात परवानगी मिळावी म्हणून संघाचे केंद्रीय कार्याध्यक्ष रवींद्र अढाऊ यांनी नागपूर पालिका आयुक्त,पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांना रीतसर पत्र दिले आहे.

सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे अध्यक्ष गोपीचंद पडळकर,तर कार्याध्यक्ष सदाभाऊ खोत आहेत.दरम्यान,एसटी कर्मचारी विलीनीकरण आंदोलना दरम्यान मान्य केलेल्या १६ मागण्या अद्याप मान्य न केल्यामुळे उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने मुख्यमंत्र्यांना मागण्या मान्य करण्यासाठी आठवण करून दिली आहे.एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय आमदारांची समिती स्थापन करण्यात आली होती. या. त्यावेळी १८ पैकी १६ मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या.मात्र,शिंदे-फडणवीस सरकारकडून यासंदर्भात एकदाही चर्चा करण्यात आलेली नाही.गेल्या सहा महिन्यांपासून कोणतीच कार्यवाही न झाल्याने सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

दरम्यान, मागण्यांची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीचे आश्वासन देऊनही कोणताच निर्णय झाला नसल्याने तसेच प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचाऱ्याची परिस्थिती पाहून १९ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात आमरण उपोषणाचा निर्णय घेतल्याचे सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाने पत्रात म्हटले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami