संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 02 February 2023

गंगेप्रमाणे नाशिकच्या गोदा तीरावर दररोज महाआरती!५ कोटींचा निधी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

११ पुजार्‍यांची नेमणूक करणार

नाशिक – नाशिकच्या रामकुंडाचा कायापालट होणार असून अयोध्येतील शरयू नदीसह वाराणसी आणि हरिद्वारच्या धर्तीवर आता नाशिकच्या गोदावरी नदीची देखील रोज महाआरती होणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.पंचायतम सिद्धपीठमचे महंत अनिकेत शास्त्री यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला होता.त्यामुळे अखेर गोदावरी नदीवर महाआरती करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे.
गंगा नदीची पवित्र नदी म्हणून ओळख आहे.गंगा नदीला मोठे धार्मिक महत्त्व देखील प्राप्त आहे. त्याचप्रमाणे नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला देखील दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखले जाते.गोदावरी नदी देखील गंगा नदीप्रमाणेच धार्मिक महत्त्व प्राप्त असलेली एक महत्त्वाची नदी आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा देखील भरत असतो आणि याठिकाणी देशभरातील भाविक आणि अनेक नागरिक अस्ती विसर्जनासाठी येत असतात गोदावरी नदीला अनन्य साधारण महत्व देखील प्राप्त आहे.त्यामुळेच आता गंगेप्रमाणे नाशिकच्या रामकुंड परिसरात रोज महाआरती होणार आहे. तसेच यासाठी ११ पुजार्‍यांची नेमणूकदेखील केली जाणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami