संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 31 March 2023

गंभीर आजाराने त्रस्त असलेले गिरीश बापट प्रचारात उतरले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे – कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार हेमंत रासन यांच्या प्रचार मेळाव्यात गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराने त्रस्त असलेले भाजपचे खासदार गिरीश बापटांनी आज संध्याकाळी हजेरी लावली. केसरीवाड्यात भरवण्यात आलेल्या प्रचार मेळाव्यात बापट व्हिलचेअरवरुन बसून आले आणि त्यांनी आपले भाषण लिहून दिले. दरम्यान, यापूर्वी भाजपच्याच मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांनाही गंभीर आजारपणातही मतदानासाठी विधानभवन गाठावे लागले होते. याच दोघांच्या निधनामुळे पोटनिवडणुका होत आहेत.

आमदार म्हणून बापटांनी कसबा विधानसभा मतदारसंघाचे 30 वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. सध्या ते पुण्याचे खासदार आहेत. गंभीर आजाराच्या कारणास्तव पोटनिवडणुकीच्या प्रचारात सक्रिय झाले नव्हते. तसे प्रसिद्धी पत्रकही बापटांनी जाहीर केले होते. बापटांचे प्रचारातील महत्त्व लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाश शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काल संध्याकाळी बापटांची भेट घेतली होती. त्यानंतर बापट यांच्या उपस्थितीत केसरीवाड्यात मेळावा पार पडणार असल्याचे उघड झाले. त्यानंतर आज संध्याकाळी या मेळाव्यात हजेरी लावली. व्यासपीठावर येताच त्यांनी आपल्या हाताने आपले भाषण लिहून दिले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या