संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

गजानन महाराजांचा प्रकट दिन यंदाही साधेपणाने साजरा होणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

शेगाव – श्री गजानन महाराजांचा १४४ वा प्रकट दिन उत्साहात परंतु अत्यंत साध्या पद्धतीने यंदा साजरा करण्याचा निर्णय शेगाव देवस्थानने घेतला आहे. मोजके भाविक आणि वारकऱ्यांच्या उपस्थित हा प्रगट दिन सोहळा साजरा केला जाणार आहे. भाविकांना दर्शनासाठी ई-पासची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, असेही संस्थानाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शेगावच्या गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा दर वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला तो. मात्र दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे तो साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. यंदाही हा कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साधेपणाने साजरा केला जाणार आहे. हा प्रगट दिन सोहळा १७ ते २३ फेब्रुवारी या काळात धार्मिक प्रथा, परंपरेनुसार मर्यादित लोकांच्या उपस्थितीत कोरोनाचे नियम पाळून साजरा केला जाणार आहे. भाविकांना ई-पासद्वारे दर्शन, निवास आणि भोजन प्रसादाची व्यवस्था केली आहे, अशी माहिती संस्थानाने दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami