मुंबई – ‘गण गण गणात बोते’चा गजर, अभिषेक, पालखी, पारायण अशा धार्मिक वातावरणात श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात येतो. यंदा सोमवार १३ फेब्रुवारी सोमवार रोजी श्री संत गजानन महाराजांचा १४५ वा प्रकटदिन विक्रोळीतील संत श्री गजानन महाराज शेगाव सेवा मंडळातर्फे आयोजित करण्यात आला आहे. या मंडळाच्या सोहळ्याचे यंदाचे ५० वे वर्ष आहे. हा सोहळा सोमवारी सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.विक्रोळीतील कन्नमवार नगर-२ येथील विकास हायस्कूल समोरच्या रवींद्र म्हात्रे मैदानात हा सोहळा होणार आहे.मुंबई परिसरातील हजारो भाविक यावेळी दर्शन व तीर्थ प्रसादाचा लाभ घेत असतात.यादिवशी भक्ती संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.