संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

गडहिंग्लजच्या जवानाने चक्क बर्फामध्ये साकारला शिवरायांचा अश्वारूढ पुतळा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

श्रीनगर – जम्मू-काश्मिरमधील श्रीनगर परिसरात मराठा बटालियनच्या जवानांनी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. यानिमित्त गडहिंग्लज तालुक्यातील शेंद्री येथील जवान प्रदीप तोडकर यांनी १० फूट उंचीचा छत्रपती शिवरायांचा पुतळा बर्फामध्ये साकारला होता. त्याला पुष्पहार अर्पण करून जयघोष करण्यात आला.

बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्रीची तुकडी श्रीनगरमध्ये कार्यरत आहे. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात आला असून दरवर्षी शिवजयंती साजरी केली जाते. प्रदीप तोडकर हे
त्याठिकाणी कर्तव्य बजावत आहेत. त्यांनी मोठ्या कल्पकतेने यावर्षी बर्फात पुतळा साकारला होता. त्यांना मुंबईचे जवान अशोक रगडे यांनीही सहकार्य केले. शनिवारी सकाळी १० वाजता अधिकाऱ्यांच्या हस्ते बर्फातील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर जवानांनी सामूहिक आरती व शिवगर्जना सादर केली. पाकिस्तान सीमेवर समुद्र सपाटीपासून १५०० मीटर उंचीवर मराठा बटालियन सध्या कार्यरत आहे. त्या परिसरात उणे २५ अंश सेल्सिअस तापमान आहे. अशा कडाक्याच्या थंडीत या जवानांनी यंदाची शिवजयंती साजरी करून दाखवली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami