संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

गणेशोत्सवात आवाज वाढला! मुंबईत उच्चांकी ध्वनी प्रदूषण

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – कोरोनाच्या निर्बंधांनंतर यंदा शहरात दणक्यात गणेशोत्सव सुरू आहे. त्यात गणेशोत्सव मंडळांनी ध्वनी प्रदूषणाचा कहर केला आहे. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाने १८ वर्षांचा उच्चांक मोडला आहे. रविवारी ४ सप्टेंबरला बाबुलनाथ रोडवर ११५ डेसिबल, मरीन ड्राईव्हमध्ये ९३ डेसिबल आवाजाची नोंद झाली. २०२० मध्ये येथे १००.७ आणि २०२१ मध्ये ९३.१ डेसिबल आवाजाची नोंद झाली होती, अशी माहिती आवाज फाउंडेशनने दिली. कोरोनाच्या निर्बंधांमुळे २ वर्षे गणेशोत्सव भाविकांच्या गर्दीशिवाय साजरा झाला. त्यामुळे ध्वनी प्रदूषणालाही आळा बसला होता. मात्र यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्यात काही ठिकाणी आवाजाची मर्यादा ओलांडली जात आहे. परिणामी १८ वर्षांचा ध्वनी प्रदूषणाचा उच्चांक झाला आहे. त्याचा त्रास रुग्णांना होतो. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. २०१५ मध्ये १२३.७ डेसिबल आणि २०१३ मध्ये १२३.२ डेसिबल आवाजाची नोंद झाली होती. २००३ साली सर्वाधिक ध्वनी प्रदूषण झाले होते. त्यानंतर यावेळी रविवारी ५ दिवसांच्या गणपती विसर्जनात मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण झाले. बागुलनाथ मार्ग आणि मरीन ड्राईव्ह भागात ११५.६ डेसिबल आवाजाची नोंद झाली. लिंकिंग रोडवर १०९.४ डेसिबल आवाजाची नोंद झाली. ढोल-ताशा पथकाचे ढोल लोखंडी हातोड्याने वाजवले जातात. त्यातून मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते. असे असले तरी मुंबईत कोठेही ध्वनी प्रदूषणाची तक्रार आलेली नाही, अशी माहिती महापालिका उपायुक्त रमाकांत बिरदार यांनी दिली. आवाज पातळीच्या नोंदीची कोणतीही यंत्रणा पालिकेकडे नाही. हे काम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आहे, असे त्यांनी सांगितले. १२० डेसिबल आवाजाने कानाच्या पडद्याला गंभीर इजा पोहोचते. रक्तदाब आणि डोकेदुखी यांचा त्रास होतो, असे आवाजच्या तज्ञांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami