संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

गलवान खोऱ्यातील शहिदाची पत्नी लष्करी अधिकारी होणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्ली – पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात १५ जून २०२० रोजी चीनी सैनिकांसोबत झालेल्या संघर्षात शहीद झालेले नायक दीपक सिंग यांची २३ वर्षांची पत्नी रेखा देवी भारतीय लष्करात अधिकारी म्हणून दाखल होणार आहे. ती लष्करी सेवेची परीक्षा आणि मुलाखतीत पास झाली आहे.

गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झटापटीत शहीद झालेल्या मध्य प्रदेशातील रीवा येथील नायक दीपक सिंह यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते मरणोत्तर वीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांचा हा सन्मान झाला होता. त्यावेळी दीपकची पत्नी रेखा देवीने हा पुरस्कार स्वीकारला होता. मात्र आता रेखा देवी लष्करी भरतीची परीक्षा आणि मुलाखत पास झाली आहे. त्यामुळे ती भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून दाखल होणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami