पतियाळा- पतियाळा कोर्टाने गायक दलेर मेहंदी यांना 2 वर्षांची शिक्षा कायम ठेवली आहे. 15 वर्षे जुन्या मानव तस्करी केसमध्ये त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आज पतियाळा कोर्टात सुनावणी झाली. या प्रकरणात सुनावणीदरम्यान कोर्टाने दलेर मेहंदी यांना दोषी ठरवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली.कोर्टाच्या निर्णयानंतर तातडीने दलेर मेहंदी यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. 2003 मध्ये सदर पोलिसांनी बल बेडा गावात राहणारे बक्शीस सिंह हिच्या तक्रारीनंतर दलेर मेहंदीचे भाऊ शमशेर मेहंदी ध्यान सिंह आणि बुलबुल मेहताविरोधात परदेशात पाठवण्याच्या नावाखाली फसवणूक करीत 20 लाख रुपये घेतल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला होता.