संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

गायिका वैशाली माडे हिच्या हत्येचा कट; फेसबुकवरून दिली माहिती

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – महाराष्ट्राची प्रसिद्ध गायिका वैशाली भैसने-माडेने फेसबुक पोस्ट केली आहे. त्यात तिने आपल्या हत्येचा कट रचला जात आहे. माझ्या जीवाला धोका आहे. दोन दिवसानंतर पत्रकार परिषद घेऊन मी याचा गौप्यस्फोट करणार आहे. आज मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे संगीत आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

गायिका वैशाली भैसने-माडेने काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिचे पक्षात स्वागत केले. राष्ट्रवादीच्या मुंबईतील मुख्यालयात हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर आता वैशालीने फेसबुकवर पोस्ट टाकली आहे. काही लोकांकडून माझ्या जीवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जात आहे. दोन दिवसानंतर पत्रकार परिषद घेऊन त्याचा गौप्यस्फोट मी करणार आहे. आज मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे, अशी पोस्ट तिने केली आहे. यामुळे राजकीय आणि कला क्षेत्रात खळबळ माजली आहे. वैशाली सामान्य शेतकरी कुटुंबातून आली आहे. तिने हिंदी आणि मराठी भाषांमधील सिनेमांमध्ये पार्श्वगायन केले आहे. ‘बाजीराव मस्तानी’ या हिंदी सिनेमातील ‘पिंगा’ हे तिचे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. असे असताना वैशालीने अचानक केलेल्या या फेसबुक पोस्टमुळे खळबळ माजली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami