मुंबई:- गिरगावातील ५४ वर्षीय गीता गिरकर या महिलेवर ॲसिड हल्ला झाला होता. या हल्ल्यात गीता यांचा एक डोळा निकामी झाला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. 18 दिवसांनी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गिरगाव परिसरात गीता गिरकर आपल्या दोन मुलांसोबत राहत होत्या. पती सोडून गेल्याने विभक्त राहणाऱ्या गीता गिरकर त्या गेल्या 25 वर्षापासून पुजारी सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होत्या. महेश पुजारीचे देखील पहिले लग्न झाले होते. पुजारीला देखील मुले आहेत. गीता यांची मुले मोठी होत असल्याने महिलेने पुजारी सोबत राहण्यास नकार देत पहिल्या पत्नीकडे जाण्यासाठी तगादा लावला होता. याचाच राग मनात ठेवून पुजारी याने 13 जानेवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास गीता गिरकर पाणी भरण्यासाठी घराच्या बाहेर आल्या तेव्हा संधी साधून तिच्यावर ॲसिड फेकले होते.