संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 30 June 2022

गिरीष बापट यांच्या घराबाहेर कॉँग्रेसचे ‘माफी मागो’ आंदोलन

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने कोरोना देशात पसरविला. या वक्तव्याच्या निषेधार्थ तसेच शिवजयंतीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या जनतेची जाहीर माफी मागावी यासाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भाजपा खासदार गिरीष बापट यांच्या घराबाहेर ‘माफी मागो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

लोकसभेत भाषण करताना पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनी पहिल्या लाटेत कॉँग्रेसने हद्द केली. देश लॉकडाऊनचे पालन करत होता. तेव्हा कॉँग्रेसवाल्यांनी मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर श्रमिकांना मोफत तिकीट दिले आणि लोकांना प्रेरित केले की जा आणि महाराष्ट्रातील आपले ओझे कमी करा. जा तुम्ही यूपी, बिहारचे आहात…जा असे म्हटले होते. पंतप्रधानांच्या या वक्तव्यामुळे कॉँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. आज कॉँग्रेसने पुण्यात पंतप्रधानांनी माफी मागावी यासाठी खा. गिरीष बापट यांच्या घरासमोर आंदोलन केले. संसदेत सत्य बोलायचे असते पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने या देशाच्या जनतेशी खोटे बोलण्याचे काम करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी त्यांनी संसदेत खोटे बोलले आहे. याचा निषेध आणि शिवजयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफी मागावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी दिली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami