संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

गुजरातमधील ‘आप’पक्षाच्या कार्यालयावर पोलिसांचा छापा

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

अहमदाबाद – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमधील येणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. दिल्ली, पंजाबच्या विजयानंतर त्यांनी गुजरातमध्ये विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, या सर्व घडामोडीत आता गुजरातमधील ‘आप’च्या कार्यालयावर पोलिसांनी छापेमारी केली असल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी गुजरात पोलिसांनी अहमदाबाद येथील ‘आप’च्या कार्यालयावर छापेमारी केली आहे. आपचे नेते इसुदान गढवी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या दौर्‍यापूर्वी पोलिसांनी आपच्या कार्यालयावर छापा टाकत दोन तास पोलीस कार्यालयात होते. आम्ही पुन्हा येऊ, असेही पोलिसांनी म्हटल्याचे गढवी यांनी सांगितले. यावर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, आम्हाला गुजरातमधील नागरिकांकडून प्रचंड पाठिंबा मिळत आहे. हे पाहून भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे दिल्लीनंतर गुजरातमध्येही छापेमारी सुरू झाली आहे. दिल्लीत काही सापडले नाही, गुजरातमध्येही काही
मिळाले नाही.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami