सुरत – गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची तारीख जवळ येत असल्याने सर्वच पक्षांनी प्रचारासाठी ताकद लावली आहे. आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल दोन दिवसीय सुरत दौऱ्यावर आहेत. सुरतमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना केजरीवाल म्हणाले की, गुजरातमध्ये आप प्रचंड बहुमताने सत्तेवर येईल.मी लिहून देतो !असा आपल्या विजयाचा दावा केजरीवाल यांनी केला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुरतमध्ये माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, माझी राजकीय समज सर्वांनाच माहिती आहे, आजपर्यंत जेव्हाही मी लिखित स्वरूपात काहीही दावा केला आहे, तेव्हा तो खरा ठरला आहे. दिल्ली निवडणुकीत काँग्रेसला शून्य जागा आणि पंजाबमध्ये आपचे सरकार आल्याचा माझा दावाही खरा ठरला आहे.
गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार बनताच आम्ही ३१ जानेवारीपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू करूगुजरातमधील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आम आदमी पक्षाला एकत्र मतदान करण्याचे आवाहन केजरीवाल यांनी केले.अरविंद केजरीवाल यांनी आज सुरतमध्ये अनेक सभा घेतल्या. केजरीवाल वस्त्रोद्योगातील नेत्यांसोबत तसेच हिरे कारागिरांच्या बैठका घेतील.