संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

गुजरातमध्ये पाकिस्तानी बोटीमधून 350 कोटींचे 50 किलो ड्रग्ज जप्त

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सुरत : गुजरातच्या समुद्रात पाकिस्तानी बोटीतून 50 किलो ड्रग्ज जप्त केल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएस यांनी ही ड्रग्ज जप्तीची कारवाई केली. या 50 किलो हेरॉईन ड्रग्जची किंमत 350 कोटी रुपये आहे. याप्रकरणी भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने संयुक्त कारवाई करत बोटीवरील 6 जणांना अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) संयुक्त कारवाईत शनिवारी आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ 50 किलो हेरॉईन ड्रग्ज घेऊन जाणारी पाकिस्तानी बोट पकडली. पुढील तपासासाठी ही बोट जखाऊ बंदरात आणण्यात येत आहे.गुजरात एटीएससह आयसीजीने हे मिशन पूर्ण केल्याचे सांगितले. या बोट आणि ड्रग्जशी संबंधित अधिक माहितीसाठी एजन्सीने तपास सुरू केला आहे.खराब हवामानानंतरही गुजरात एटीएससह आयसीजीने हे मिशन पूर्ण केल्याचे सांगितले. दरम्यान,शुक्रवारी एनसीबीने मुंबईतील एका गोडाऊनमधून 50 किलो ‘मेफेड्रोन’ (अमली पदार्थ) जप्त केले, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 120 कोटी रुपये किंमत आहे. याप्रकरणी एनसीबीने ‘एअर इंडिया’च्या माजी पायलटसह दोघांना अटक केली

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami