संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के 3.5 रिष्टर स्केलची नोंद

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

सूरत – गुजरात राज्यातील काही भाग आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के बसले. भूकंपाचे केंद्र सूरत शहराजवळून साधारण 61 किलोमीटर दूर आणि जमिनीखाली साधारण 7 किलोमीटर खोल अंतरावर होते. सकाळी 10 मिनीटांनी भूकंपमापण यंत्रावर या भूकंपाची नोंद 3.5 रिष्टर स्केल इतकी झाली, अशी माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी विभागाने दिली. या भूकंपात सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाही. गुजरातच्या कच्छमध्ये ऑगस्ट महिन्यात दोन वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. यापूर्वी 3 ऑगस्ट रोजी गुजरातमधील कच्छमध्ये भूकंप झाला होता. त्यानंतर त्याची तीव्रता 3.6 इतकी मोजली गेली. त्यानंतर दुपारच्या दरम्यान पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर भूकंपाचा केंद्रबिंदू गुजरातमधील रापर शहरापासून 13 किमी दक्षिण-नैऋत्य होता.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami