संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 03 February 2023

गुणरत्न सदावर्ते याना नक्षलवाद्यांची धमकी

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई -एसटी कामगारांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते याना नक्षलवाद्यांकडून धमकीचे पात्र आले आहे. विशेष म्हणजे या पत्रात मराठा आरक्षण ,इ डब्ल्यूएस ,आरक्षणाचा उल्लेख आहे तसेच महाविकास आघाडीच्या काळात झालेल्या आंदोलनाचाही उल्लेख असल्याचे सदावर्ते यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले आहे.

या धमकी पत्रा बाबत बोलताना सदावर्ते यांनी सांगितले कि कम्युनिस्ट पक्ष भारत मुंबई विभाग यांच्याकडून नक्षली संघटनेचा संदर्भ असलेले पत्र कार्यालयास प्राप्त झाले आहे . लाल सलाम असे लिहलेले आहे सदावर्ते यांनी पुढे म्हटले आहे कि , नक्षली संघटनेच्या जनता अदालत मध्ये २२ फेब्रुवारी २०२२ च्या बैठकीत माझी हत्या करण्याचा निर्णय झाला होता. नक्षलवाद्यांच्या पत्रात महाविकास आघाडी सरकारच्या काळातील तारखांचा संदर्भ येत असून ,तो थोडा संशयास्पद आहे. कारण एप्रिल महिन्यात सिल्वर ओक वरील हल्ल्या प्रकरणी मला अटक करण्यात आली होती. त्यानंतर माझ्या निवासस्थानाची सुरक्षा कमी करण्यात आली. त्याच्या मागचे कारण विश्वास नांगरे पाटील सांगू शकतील. ते पुढे म्हणाले कि देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यानंतर, सुरक्षा विभागातून फोन आला होता. परंतु नक्षली संघटनांचा प्रतिबंध करणे आवश्यक आहे असेही सदावर्ते यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Close Bitnami banner
Bitnami