संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

गुप्तधनासाठी शंकराची पिंड बाजूला सारत खड्डा खोदला

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नांदेड – जमिनीतील गुप्तधन मिळवण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. गुप्तधनाच्या लालसेपोटी नांदेडमध्ये महादेव मंदिरातील चक्क पिंड बाजूला सारुन पिंडी खाली दहा फुटांचा खड्डा खोदल्याचा प्रकार समोर आला आहे. नायगाव तालुक्यातल्या कृष्णूर औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका हेमाडपंथी महादेव मंदिरात हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी हे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.तपास करण्यासाठी श्वान पथकाला पाचरण करण्यात आले. औद्योगिक वसाहतीत एका औषध कंपनीच्या समोरच हे पुरातन महादेव मंदिर आहे. हे मंदिर अतिशय ज्वाजल्य असून या मंदिर परिसरात गुप्तधन आहे असे येथील काही जुन्या जाणकारांचे म्हणणे आहे. यानुसार चोरट्यांनी हे उत्खनन केले असावे असा अंदाज आहे. दरम्यान कूंटूर पोलिसांना घटनास्थळावर काही उत्खनानाच्या काही वस्तू आढळल्याने त्यांनी त्यावरचे बोटाचे ठसे घेण्यासाठी फॉरेन्सिक टीमला पाचरण केलं आहे.गुप्तधनाच्या हव्यासापोटी एखाद्या श्रद्धेच्या ठिकाणी असा गैरव्यवहार करणे संतापजनक असल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली.कुंटूर पोलीस सध्या पुढील तपास करत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami