संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

गुरुदासपूर सीमेवर पाक ड्रोनची घुसखोरी बीएसएफने गोळीबार करत प्रत्युत्तर दिले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

नवी दिल्लीः भारत-पाकिस्तान सीमेवर पाक ड्रोनची घुसखोरी सुरूच आहे. गुरुदासपूरमध्ये आज सकाळी पुन्हा ड्रोनने सीमेपलीकडून घुसखोरीचा प्रयत्न केला, त्यानंतर बीएसएफ जवानांकडून चोख उत्तर देत घुसखोरी हाणून पाडली आहे. या घटनेपासून पोलीस आणि बीएसएफचे जवान संपूर्ण परिसराची पाहणी करत असून या घुसखोरीमागील कोणतेही कारण अजून स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुदासपूर सीमेवर पहाटे ५.१५ च्या सुमारास बीएसएफ जवानाला हा पाकिस्तानी ड्रोन दिसला होता. सीमेवरील रोचे पोस्ट बीओपी ८९ कॉर्प्सच्या परिसरात बीपी क्रमांक ३५/४ वर पाकिस्तान पोस्ट न्यू कन्स्ट्रक्शनच्या वतीने भारताच्या सीमेवर या ड्रोनने घुसखोरी केली होती. त्यानंतर कर्तव्यावर असलेले जवान, कॉन्स्टेबल योगेंद्र यांनी २ राऊंड फायर केले आणि नंतर दोन हलके बॉम्ब हल्ले जवानांकडून करण्यात आले. त्यामुळे ड्रोन पुन्हा पाकिस्तानच्या दिशेने निघून गेले. या घटनेनंतर पोलीस आणि बीएसएफ सतर्क झाले आहेत. परिसरात सतत शोधमोहीम राबविण्यात येत आहे. याआधीही पंजाब सीमेवर ड्रोन घुसखोरीचे अनेक प्रयत्न झाले आहेत. हे ड्रोन पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर रेकी करण्यासाठी पाठवले जात असल्यचे सांगण्यात येते.
पंजाब सीमेवर ज्यावेळी ड्रोनकडून घुसखोरी केली जाते त्यावेळी रेकी केली जात असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. सीमेपलीकडून या बाजूला येणारे ड्रोन हे सैनिक तैनात असलेल्या जागेची पाहणी करण्याकरिता पाठवले जातात असेही सांगण्यात आले आहे. सध्या ड्रोन हा घुसखोरी करण्यासाठी महत्वाचे साधन बनले असून, सीमेपलीकडून ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांची तस्करीही या ड्रोनद्वारे केली जात असून जम्मू-काश्मीरमध्येही पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या भागात या ड्रोनद्वारे दहशतवादी संघटनांना रोख रक्कम आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा केला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami