मुंबई : सुरतेहून पुढे गुवाहाटीला ५० आमदारांना घेऊन गेलेल्या एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात परत आल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या आणि शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तर राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचे शिंदे यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ५० आमदार आणि १३ खासदार तसेच आमदार खासदारांच्या कुटुंबियांसह गुवाहाटीला रवना होणार आहेत.
यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १८० जणांसाठी एअर इंडियाचे हे विशेष विमान बुक केले असल्याची माहिती आता समोर आली आहे.
शिवसेनेशी बंडखोरी केल्यानंतर शिंदे कामाख्या देवीला नवस बोलले होते. हा नवस फेडण्यासाठी हा दौरा असेल अशी माहिती मिळते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या आमदार, खासदारांच्या कुटुंबियांसह कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जाणार आहेत. शिंदे गटाचा गुवाहाटी दौरा निश्चित झाल्यानतंर आता यासाठी विशेष विमान बूक केल्याची माहिती समोर आली आहे. या दौऱ्यात आमदार, खासदार आणि त्यांचे कुटुंबिय असे १८० जणांसाठी हे एयर इंडियाचे विशेष विमान बुक करण्यात आले आहे. येत्या २६आणि २७ नोव्हेबंर असा दोन दिवसांचा गुवाहाटीचा दौरा असून या दौऱ्यात सर्वजण कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. त्यामुळे पु्न्हा एकदा २७ नोव्हेंबरला सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार, खासदार आणि त्यांचे कुटुंबीय कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. आम्ही सगळ्यांनी कामाख्या देवीला नवस केला होता. तो नवस या दौऱ्यात फेडणार असल्याचे शिंदे गटातील नेत्याकडून सांगितलं जात आहे.