संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

गुहावाटीत कारशोरुमला आग

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – गुहावाटीतील वशिष्ठ परिसरातील कार शोरुमला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना आज घडली. या आगीत करोडो रुपयांच्या कारसह मोटरसायकल जळून खाक झाल्या.
संजीव नारायण यांच्या मालकीचे सुझूकी आणि बिनीली या शोरुमला सर्वात प्रथम शार्टसर्किटमुळे आग लागली. मात्र आगीमुळे तेथील असलेले सलेंडरचा मोठा विस्फोट झाला. त्यानंतर काही क्षणात ही आग आणखी भडकली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमक दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र ही आग आटोक्यात येईपर्यंत संपूर्ण शोरूम या आगीच्या भस्मस्थानी पडले होते. तसेच महागड्या कार आणि मोटरसायकल जळून खाक झाल्या. त्यामुळे संजीव नारायणांचे कोटींचे नुकसान झाले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami