सावंतवाडी – गूळदुवे येथील श्री वीरेश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवारी ८ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार आहे. त्यानिमित्त मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या जत्रोत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गुळदुवेच्या गावकर मंडळींनी केले आहे.
सावंतवाडीच्या गूळदुवेत दरवर्षी वीरेश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सव असतो. यावेळी तो ८ नोव्हेंबरला होणार आहे. त्यात मंदिरात धार्मिक कार्यक्रम, केळी ठेवणे, ओटी भरणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री आरोलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे. या जत्रोत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गावकर मंडळींनी केले आहे.