संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Thursday, 01 December 2022

गॅसची टाकी लिक झाल्याने घराला आग

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

श्रीगोंदा- शहरातील मांडवगणरस्त्यावरील शिक्षक कॉलनी परिसरात राहणार्‍या प्रशांत टाकसाळ यांच्या घरात गॅस टाकीतून गॅस गळती झाल्याने संपुर्ण घराला आग लागली. या दुर्घटनेत जवळपास दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तर गॅस एजन्सीचे कर्मचारी जखमी झाले आहेत. फायनान्स कंपनीत नोकरी करणारे प्रशांत टांकसाळ हे शिक्षक कॉलनीत कुटुंबासह वास्तव्यास आहेत. घरातील गॅस संपल्याने त्यांनी गॅस एजन्सीमधून गॅस टाकी आणून जोडली. मात्र गॅस टाकीतून गळती झाल्याने त्यांनी संबंधित एजन्सीला फोन करुन बोलावले. गॅस कर्मचारी गॅस टाकीची पाहणी करण्यास गेले असता गॅसने आग पकडली आणि ती घरात पसरली.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami