संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 30 November 2022

गेट वेे ऑफ इंडिया परिसर 7 दिवस फेरिवाल्यांसाठी बंद

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई- गेट वे ऑफ इंडिया येथील समुद्रातील गणेशमूर्तींची विरघळलेली माती काढण्यात अडचण येऊ नये,यासाठी मुंबई महापालिकेच्या ‘ए` वॉर्डाने पुढील 7 दिवस गेट वे ऑफ इंडिया परिसरात फेरिवाल्यांना व्यवसाय करण्यास मनाई केली आहे.
गेट वेे ऑफ इंडिया येथे लहान-मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास मुंबई पोर्ट ट्रस्टने (बीपीटी)अटी-शर्तीवर महापालिकेला परवानगी दिली होती. गेट वे ऑफ इंडिया येथे विसर्जन करण्यात आलेल्या गणेशमूर्तीची माती, पूजेचे साहित्य काढत गेट वे ऑफ इंडिया येथील समुद्र स्वच्छ ठेवणे पालिकेची जबाबदारी असेल, असे स्पष्ट बीपीटीने केले होते. गेट वे ऑफ इंडियाच्या समुद्रात 48 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्ती आणि 253 घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन करण्यासाठी क्रेनचा वापर केला होता. समुद्रातील माती काढण्याचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती पालिकेच्या ‘ए` वॉर्डाच्या अधिकाऱ्याने दिली. त्यासाठी महापालिकेने पुढील 7 दिवस गेट वे ऑफ इंडिया परिसरात फेरिवाल्यांना व्यवसाय करण्यास मनाई केली आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami