संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Wednesday, 06 July 2022

गेस्ट लेक्चर्स देणाऱ्यांना आता १८ टक्के जीएसटी भरावा लागणार

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – येत्या काळात गेस्ट लेक्चर्स देणाऱ्यांनाही त्यांच्या कमाईतून १८ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. अॅडवाहन्स रुलिंग अथॉरिटीच्या कर्नाटक खंडपीठाने ही व्यवस्था केली आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, अर्जदार साईराम गोपालकृष्ण यांनी अॅडवाहन्स रुलिंग अथॉरिटीला संपर्क साधून यांसदर्भात विचारणा केली होती. अतिथी व्याख्यान ही सेवा असून ही सेवा करपात्र आहे का? यातून मिळणारे उत्पन्न करपात्र ठरेल का? यावर अॅडवाहन्स रुलिंग अथॉरिटीने हा निर्णय घेतला आहे.

व्यवसायिक, तांत्रिक आणि व्यवसायिक सेवांच्या अंतर्गत येणाऱ्या सेवांना सूट मिळत नाही. त्यामुळे या सेवांवर १८ टक्के जीएसटी भरावा लागेल. महत्त्वाचं म्हणजे गेस्ट लेक्चर्स देणाऱ्या प्राध्यापकाचे उत्पन्न २० लाखांपेक्षा जास्त असल्यास त्यांना त्यावर १८ टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. या निर्णयामुळे फ्रिलान्सर, प्राध्यापक, संशोधक यांच्या उत्पन्नावर परिणाम होणार आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami