संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

गोंदियात आदिवासी विद्यार्थ्याला मारहाण केल्याने शिक्षक निलंबित

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

गोंदिया – जिल्हयातील देवरी प्रकल्प अधिकारी कार्यालया अंतर्गत येणाऱ्या बोरगाव आदिवासी आश्रम शाळेतील पाचव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थाला शिक्षकाने मारहाण केली असल्याने विद्यार्थांच्या डोक्यावर मार लागलेला आहे. त्यामुळें शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.

देवरी तालुक्यात आदिवासीं विभागाअंतर्गत शासकीय आश्रम शाळा चालविल्या जात आहेत. बोरगाव येथे निवासी शाळा असल्याने आदिवासी विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. पण पाचव्या वर्गात शिकत असलेल्या अक्षय पंधरे या विद्यार्थ्याला ठेंगरे नामक शिक्षकाने मारहाण केली त्यामूळे अक्षय याच्या डोक्याला मार लागला. अक्षयने संपुर्ण घटना आपल्या घरच्या लोकांना सांगीतले असताना घरच्या लोकांनी प्रकल्प कार्यालयात शिक्षका विरुध्द तक्रार दाखल केली. त्यामुळें प्रकल्प अधिकारी राचेलवर यांनी तात्काळ शाळेत पोहचत विद्यार्थ्याला उपचारा करीता रूग्णालयात पाठवत चौकशी केली असता ठेंगरे या शिक्षकाला निलंबित केले आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami