संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Friday, 01 July 2022

गोंदियात एकतर्फी प्रेमातून अकरावीच्या विद्यार्थिनीची हातोडीने वार करून हत्या

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

गोंदिया – इयत्ता अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने हातोड्याने वार करत निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चिरामणटोला येथे घडली. दुर्गाप्रसाद गणेश रहांगडाले असे या प्रकरणातील आरोपीचे नाव असून पोलिसानी त्याला अटक केली आहे.

दुर्गाप्रसाद हा काही वर्षांपासून प्रेमासाठी या तरुणीच्या मागे तगादा लावत होता. काल ही मुलगी ट्यूशनवरून घरी परतत होती. त्यावेळी त्याने प्रेमासाठी तिच्यामागे तगादा लावला. मात्र तिने काहीच उत्तर न दिल्यामुळे संतापून त्याने तिची हत्या केल्याचा दावा केला जात आहे. हत्येनंतर गावातील लोकांनी त्याला घेराव घातला. त्यावेळी लोकांचा जमाव पाहून त्याने हातोडीने स्वतःवरही वार करून स्वतःला जखमी करून घेतले. त्यानंतर जखमी अवस्थेत गावकर्‍यांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. आता पुढील तपास रावणवाडी पोलीस करत आहेत.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami