गोंदिया – गडचिरोलीनंतर आता जंगली हत्तीनी आपला मोर्चा गोंदियाकडे वळवला आहे. गोंदियात हत्तीनी शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. हत्तींच्या वावरामुळे येथील नागरिक आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना वन विभागाने दिल्या आहेत.
गडचिरोलीत काही दिवसांपासून जंगली हत्तींचा वावर होता. त्यांनी तिथे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान केले. त्यानंतर हत्तींचा हा कळप आता गोंदियात पोहोचला आहे. त्यांनी तेथील धान शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. हत्तींच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिक आणि शेतकऱ्यांनी हत्तीच्या कळपापासून सावध राहावे, अशी सूचना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गोंदियातील शेतकरी आणि नागरिकांना केली आहे.