गोंदिया- जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील ठाणा येथील एका प्राध्यापकाच्या ३० वर्षीय विवाहित महिलेने आपल्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दिपा धर्मेंद्र मेहर असे या आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. दिपा यांचा चार महिण्यापुर्वीच विवाह झाला होता. त्यामुळे त्यांच्या अशा आत्महत्येने परिसरात खळबळ माजली आहे.
दीपाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजलेले नाही. दिपाचे चार महिन्यांपूर्वी प्राध्यापक धर्मेंद्र मेहर यांच्याशी लग्न झाले होते. प्राध्यापक धर्मेंद्र मेहर यांच्या पूर्व पत्नी अंकिता यांचे कोरोनामुळे निधन झाले होते, त्यांच्या मागे एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलांचे संगोपन करण्यासाठी ऑक्टोबरमध्ये धर्मेंद्र यांनी दिपाशी दुसरा विवाह केला होता. त्यांच्या संसाराला जेमतेम चार महिने झाले असतांना दिपाने आत्महत्या का केली हे मात्र गूढ कायम आहे. याबाबत अधिक तपास आमगाव पोलीस करीत आहेत.