मुंबई – कोल्हापुरातील प्रसिद्ध गोकुळ दूध संघाने विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, उद्यापासून कोल्हापूर, मुंबई आणि पुणे शहरात दुध विक्रीत होणार वाढ होणार आहे. मुंबईत म्हशीच्या दूध दरामध्ये तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तर गायीच्या दुधात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईत म्हशीच्या दुधाचा दर आधी प्रतिलिटर 69 रुपये होता तो आता 72 रुपयांवर पोहोचणार आहे. तर गायीच्या दुधाचा दर 54 वरून 56 रुपयांवर प्रति लिटर पोहोचणार आहे. शुक्रवारपासून दराची अंमलबजावणी झाली आहे.