संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Monday, 27 March 2023

गोरेगावच्या नेस्को कोविड सेंटरमधील
भंगाराच्या विक्रीतून ७८ लाख मिळाले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – कोरोना काळात मुंबईत झपाट्याने वाढणार्‍या कोविड प्रादुर्भावानंतर रुग्णांना उपचार आणि विलगीकरण सुविधा देताना त्या अपूर्ण पडत होत्या. त्यामुळे पालिकेने गोरेगाव नेस्को येथे जंबो कोविड सेंटर उभारले होते.मात्र आता कोरोना संपल्याने हे कोरोना सेंटर बंद करण्यात आले आहे.बंद स्थितीत असल्याने यातील साहित्य गंजू लागल्याने त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने या भंगाराची नुकतीच लिलावात बोली लावून विक्री केली.त्यातून पालिकेला ७८ लाख रुपये मिळाले आहेत.

हे कोरोना सेंटर बंद केल्यानंतर त्यासाठी उभारलेल्या मंडपाचे साहित्य काढले.पण आतील स्टील, ऍल्युमिनियम,नोवापॅन शिफ्ट,सिमेंट वॉल पॅनेल्स आदी सारखे साहित्य गंजून खराब होण्याआधी त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे होते. म्हणून त्याची भंगार भावाने विक्री करण्यात आली.त्यासाठी लावलेल्या
लिलाव बोलीमध्ये एमएस स्टील-६६ लाख ७० हजार रुपये, ऍल्युमिनियम-१ लाख ९६ हजार रुपये, जीआय रफिग- ९ लाख ५ हजार रुपये,नोवापॅन शिफ्ट-३४ हजार रुपये आणि सिमेंट वॉल पॅनेल्स-१५० रुपये अशी किंमत मिळाली. अशाप्रकारे ७८ लाख रुपये पालिकेला या भंगारात मिळाले आहेत.या कोविड सेंटरसह मुंबईत त्यावेळी बीकेसी,वरळी, कस्तुरबा, सेव्हन हिल्स आदी ठिकाणीही कोरोना केअर सेंटर उभारली होती.

आजचे हवामान
ताज्या बातम्या