संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Tuesday, 05 July 2022

गोरेगावच्या रसिका अवेरेचा तुर्कीत डंका; आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत रौप्यकमाई

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – गोरेगावमध्ये राहणाऱ्या रसिका अवेरेने देशाची मान अभिमानाने उंचावली. रसिकाने युरोप तुर्की येथे पार पडलेल्या आशियाई पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत
उल्लेखनीय कामगिरी करत देशासाठी रौप्य पदकाची कमाई केली आहे.

तुर्की (इस्तंबूल) येथे पार पडलेल्या स्पर्धेत २४ ते ३० डिसेंबर दरम्यान रसिकाने ही नेत्रदीपक कामगिरी केली. प्रशिक्षक अमान सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली रसिकाने रौप्य पदकाला गवसणी घातली.

हलाखीची परिस्थिती असताना त्यावर मात करत रसिकाने ही अनन्यसाधारण कामगिरी करुन दाखवली. आपल्या मुलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी दागिने गहाण ठेवले. अखेर रसिकाने आई वडिलांच्या कष्टाचं चीज केलं.

गोरेगावमधील दुग्ध वसाहतीतील यूनिट क्रमांक 7 मधील शिवशक्ती रहिवाशी संघामधील आगरी पाड्यात राहणाऱ्या रसिकाने देशाचं नाव जागतिक पातळीवर उंचावलं. तिच्या या कामगिरीसाठी तिचं स्थानिक नेत्यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami