संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 01 April 2023

गोरेगाव फिल्मसिटीत बिबट्याची
मेकअपमनच्या दुचाकीला धडक

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

मुंबई – गोरेगाव चित्रनगरीत बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या आगामी ‘बड़े मियां छोटे मियां’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना एका मेकअपमनच्या दुचाकीला बिबट्याने धडक दिल्याची घटना घडली.यात मेकअपमन जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल केले आहे.
जखमी झालेल्या मेकअपमनचे नाव श्रवण विश्वकर्मा ( २७ ) असे आहे.या घटनेने चित्रपट कलाकारांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. ‘बड़े मियां छोटे मियां’चे शुटींग गोरेगाव चित्रनगरीत हेलीपॅड टेकडी परीसरात सुरू आहे. शुक्रवारी रात्री एका मित्राला सोडायला गेलेल्या मेकअपमन श्रवण विश्वकर्मा ( २७ ) यांच्या गाडीवर अचानक बिबट्याने हल्ला केला.त्यात खाली पडून श्रवण गंभीर जखमी झाले आहेत.त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता ठीक असल्याचे समजते.तो मित्राला सोडून एकटा असताना अचानक रस्त्यावरुन डुक्कर जात होते. त्याला पाहत असताना अचानक बिबट्याने त्याच्या गाडीला धडक दिली. त्यात तो खाली कोसळून बेशुद्ध झाला. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले.या जखमी झालेल्या मेकअपमनच्या उपचाराचा सर्व खर्च चित्रपटाच्या प्रोडक्शन हाऊसने उचलला आहे.

आजचे हवामान
ताज्या बातम्या