पणजी- उत्तर गोवा जिल्ह्यातील सत्तरी तालुक्यातील वाळपई नगरपालिका हद्दीजवळच्या होंडा-कुडणे गावातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणार्या आजोबा देवस्थानचा पादुका अर्पण सोहळा यंदा रविवार १८ डिसेंबर रोजी पारंपरिक पद्धतीने पार पडणार आहे.या पार्श्वभूमीवर सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मंदिरात विविध धार्मिक विधी आणि महाभिषेक होणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
यादिवशी दुपारी एक वाजता महाप्रसाद वाटप होणार असून सायंकाळी सात वाजता डॉ. प्रविण गावकर यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमात पल्लवी पाटील आणि साथी कलाकार सहभागी होणार आहेत.कोरोना काळानंतर पहिल्यांदाच हा पादुका अर्पण सोहळा जल्लोषात केला जाणार असल्याने आयोजन समिती त्यासाठी जय्यत तयारी करताना दिसत आहे.