संपादक : सौ. जयश्री खाडिलकर - पांडे
Saturday, 03 December 2022

गोव्यातील दांडी वेळसाव किनाऱ्यावर स्थानिकांनी सीमा सर्व्हेक्षण बंद पाडले

Facebook
Twitter
WhatsApp
Telegram
Email

वास्को – गोव्यातील दांडो वेळसाव किनाऱ्या संदर्भात सीमा सर्व्हेक्षण करण्यासाठी आलेल्या पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांना स्थानिकांच्या विरोधामुळे काम पूर्ण न करता हात हलवत माघारी परतावे लागले.स्थानिकांनी प्रचंड विरोध करत हे सर्व्हेक्षणाचे कामच बंद पाडले.स्थानिक नागरिक आणि ग्रामपंचायतीला कोणतीही कल्पना न देता हे काम केले जात असल्याचा आरोप यावेळी स्थानिक रहिवाशांनी केला. पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी केवळ सीमा सर्व्हेक्षण केले जात असल्याचा दावा केला आहे.मात्र त्याठिकाणी कोळसा उतरविण्यासाठी जेटी बांधली जाणार असल्याचा संशय व्यक्त केला आहे. म्हणूनच स्थानिकांनी या कामाला विरोध केला.वास्तविक या सर्व्हेक्षणासंबधी कुठ्ठाळी मतदार संघाचे आमदार अंथोनी वास यांना माहिती देण्यात आली होती असे पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.पण आमदारांनी तसे ग्रामस्थांना काहीच सांगितले असे स्थानिकांनी यावेळी म्हटले. वेळसावचे पंच फ्रान्सिस ब्रान्गाजा यांनी सांगितले की,पर्यटन विभागाचे अधिकारी आम्हाला रीतसर कागदपत्रे आणि योग्य मंजुरी तसेच योग्य माहिती जोपर्यंत ग्रामपंचायतीला देत नाहीत तोपर्यंत आम्ही हे सर्व्हेक्षणाचे काम होऊ देणार नाही.तर काम करण्यापूर्वी ग्रामपंचायतीला कळवणे गरजेचे असल्याचे सामाजिक कार्यकर्ते ओलांसियो सिमाइस यांनी सांगितले.

आजचे हवामान
ताज्या बातम्या
Scroll to Top
Close Bitnami banner
Bitnami