पणजी- गेल्या दोन वर्षानंतर प्रथमच गोव्यातील फोंडा शहरात ८ मार्च रोजी भव्य शिमगोत्सव मिरवणूक निघणार आहे.फोंडा तालुका अंत्रुज शिमगोत्सव समिती आणि फोंडा पालिका मंडळातर्फे या शिमगोत्स्वनिमित्त रोमटामेळ,चित्ररथ, लोकनृत्य,वेशभूषा आणि विशेष मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.मात्र ही मिरवणूक आणि सर्व कार्यक्रम हायकोर्टाच्या आदेशानुसार रात्री १० वाजेपर्यंतच सुरू ठेवावेत, असे आवाहन कृषी मंत्री आणि या शिमगोत्सव समितीचे अध्यक्ष रवी नाईक केले आहे.
या शिमगोत्सव मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर काल कृषी मंत्री रवी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली खास बैठक घेण्यात आली. यावेळी सूचना करण्यात आल्या.या शिमगोत्सवातील सर्व कार्यक्रम रात्री १० वाजण्यापूर्वी समाप्त करण्यासाठी विविध पथकांनी अगोदरच नोंदणी करावी.तसेच सर्व पथकांनी ठरलेल्या वेळेत हजर राहण्याची सूचना करण्यात आली.त्याचप्रमाणे आणखी काही बाबींवर चर्चा करण्यासाठी १७ फेब्रुवारी रोजी फोंडा पालिकेच्या सभागृहात पुन्हा एकदा खास बैठक घेतली जाणार आहे.कालच्या बैठकीला मंत्री नाईक यांच्यासह नगराध्यक्ष रितेश नाईक, खजिनदार किशोर नाईक,
अशोक नाईक,गुरुनाथ नाईक आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.